(अ) राष्टीकृत बॅंकांतील स्टेशनरीत (उदा. सर्व प्रकारचे अर्ज, शीर्षपत्रे- letterheads-धनादेश, पासबुके इ. ) स्थानिक भाषेचा समावेश असतो का?
(आ) पोष्टातील स्टेशनरी त्रिभाषासूत्रानुसार असते का?
(ई) रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्याचे प्रपत्र (from) किती भाषांत असते?
हे सर्व मसुदे मराठीत भरून सुपूर्त केल्यास त्याला अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक सन्मानाची / समानतेची आणि न्यायाची असते की नाही त्याची पडताळणी पाठपुरावाही ह्या उपक्रमाद्वारे करावा, अशी माझी विनंती आहे.