ज्याला जसे हवे तसे त्याने भाषांतर करावे. मला त्यात स्वारस्य नाही.

"अरे मालका तुझे बंदे आम्ही, असे असोत आमचे करम" असेही कोणी भाषांतर केले तर त्यातून कोणाला आनंद होत असेल तर होवो बापडा! मी कोण त्यावर बोलणार?

माझा प्रश्न प्रशासनालाच होता की नेकी-बदी सारखे शब्द जसेच्या तसे वापरून जर बाळबोध कोडी घातली जात असतील तर किती बाळबोध असावीत? २+२ किती किंवा १ * १ किती चालावे काय?

माझ्या मनातील खर्राखुर्रा प्रश्न हाच आहे, शब्दकोड्यांतील सूत्रांत प्रशासन योग्य बदल करते असे आधी वाचले आहे तर मग इथे तपासणी होते का किंवा काही निकष आहेत का? - या अनुषंगाने माझा प्रश्न मला साहजिक वाटतो.

आपल्या भाषांतराबद्दल किंवा लेखाबद्दल काहीच म्हणणे नाही.