'एकदा'चा अपवाद सोडून द्या.

ज्याचा अर्थ (एके)वेळीं असा होतो असा एकदा हा एकटाच तत्सम मराठी शब्द नाही. सर्वदा हा आणखी एक शब्द.  ह्याचा मराठीत अर्थ सर्ववेळीं म्हणजे नेहमी असा आहे. (सदा सर्वदां योग तूझा घडावा --रामदास). ह्या दोन्ही शब्दांतील 'दा'चा देणारी असा अर्थ होऊ नये म्हणून जुन्या मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार हे शब्द 'एकदां'/'सर्वदां' असे अंत्याक्षरावर अनुस्वार देऊन लिहीत. आता नियम बदलले आणि अर्थाचे अनर्थ झाले. दोन्ही अर्थाने सर्वदा वापरलेला संस्कृत श्लोकः

शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे । सर्वदा सर्वदास्माकं संनिधिं सन्‍निधिं क्रियात् ॥                               शरदऋतूतील कमलाप्रमाणे (सुंदर) मुख असलेली आणि सर्व (इष्ट वस्तू) देणारी अशी शारदा सर्वदा आमच्या मुखकमलात (आणि) आमच्याजवळ चांगला निधी करो.  (आमच्या मुखात सदैव सरस्वती वसती करो, आणि आमच्या तोंडून नेहमी चांगली भाषा उच्चारली जावो.---- हा भावार्थ.)