अशा दुधाळ, जरा जास्तच गोड व वेलची व जायफळयुक्त कॉफीला जावई कॉफी असे नाव आहे. अशी कॉफी तयार करायची तर त्यासाठी थेट केरळमधून आणलेली खमंग कॉफीपूड पाहिजे. नेसकॉफी सारखी इन्स्टंट कॉफी वापरून अशी कॉफी तयार होत नाही. जायफळ किसण्याची एक खास किसणी असते. (तुळशी बागेत मिळेल) ती वापरून किंवा सहाणेवर दुधात उगाळून जयफळ उकळत्या कॉफीत घालावे. ही कॉफी तब्येतीत बनवावी लागते व चाखत चाखत प्यावी लागते.