हे वाचून माय फेअर लेडी या चित्रपटातल्या प्रोफेसर हिगिन्सचं "व्हाय कान्ट अ वुमन बी मोअर लाईक अ मॅन " ची आठवण झाली. फेमिनाईन कोशंट वरचे भाष्य आवडले. पण आजकाल मुलींसाठी अशा लहानसहान गोष्टींना तोंड देणं ही इतकी सवयीची गोष्ट झाली आहे की आता रागही येत नाही. पण असा संकुचित दृष्टीकोन असणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांची कधीकधी कीव करावीशी वाटते. बिचाऱ्यांचा पुरुषी अहंकार सतत दुखावतच अस्तो त्याला काय करणार ना....

--अदिती