जर एखाद्या सदस्याची असे कोडे घालण्याची इच्छा असेल आणि इतर सदस्यांची ती सोडवण्याची इच्छा असेल तर अशी कोडी घालण्यात काहीच वावगे नाही असे वाटते. मला स्वतःला अनुवादाची कोडी सोडवावीशी वाटत नाहीत त्यामुळे मी तिकडे जात नाही. मात्र अनेकांना ही कोडी आवडतात असे कोड्यांवर येणाऱ्या उत्तरांवरून दिसत आहे.
हेच मनोगताचे खरे यश आहे असे वाटते. संचालकांच्या मर्जीप्रमाणे लेखन आणि प्रतिसाद दिसण्याची सोय असणारी अनेक संस्थळे आहेत मात्र मनोगतावर दिसणारे लेखन हे सदस्यांच्या मर्जीप्रमाणे असते असे निरीक्षण आहे.
आपला,
(निरीक्षक) आजानुकर्ण