आहे खरे हे. मात्र "आपल्या रूटस" बद्दल कधीकाळी पाहिलेल्या /अनुभवलेल्या गोष्टींचे आपले मत इतक्या वर्षानंतर पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्यानंतर मराठीच पेपरमधून अशा रितीने खुलेआम पणे कोणत्याही अभ्यासा शिवाय व्यक्त करणे हे वर्तन अतिशय जबाबदार आहे काय? दरिद्री ह प्रादेशिक गुण आहे कधी पासून झाला की महारष्ट्रालाच तो येउन चिकटावा?
शिवाय हे मराठीच पेपर मध्ये छापले कसे काय जाउ शकते ही एक आश्चर्याची बाबच नव्हे काय? आणि आपला असा बिनदिक्कत केलेला अपमान स्वाभिमानी मराठी माणसाने असाच झेलावा काय? तसेच या सर्वांच्या वरती येउन आपण आपल्या सर्व समाजाकडे भारतीय समाज म्हणून कधी पाहणार आहे?
वरील प्रश्नान्ची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते आहे ...