पहिली गोष्ट म्हणजे "सृष्टीलावण्या" याचा अर्थ काय?

माझ्यासारख्या मराठीप्रेमीला आधी बेस्ट म्हणजे काय ते सांगा ;) आम्हा मुंबईकरांना फक्त बेस्ट ही वाहतूक 
सेवा माहित आहे.  

जड पोहे भाजून कसे लागतात याविषयी संदेह आहे! आणि मिरची कमी तिखट आहे हे कसे समजायचे?

जाड पोहे खरपूस भाजून,  फोडणी घालून केलेला चिवडा पण मस्त लागतो.  आवडत असेल तर लसणाची 
फोडणी घालावी.   

साधारणत: पोपटी व फोपश्या मिरच्या कमी तिखट असतात आणि जर्द हिरव्या व बारीक (लवंग्या) मिरच्या 
तिखट असतात.  मिरच्या चिरल्या किंवा मोडल्या की जो वास येतो त्यावरून कळू शकते.  

चव नक्की कळण्याचा हमखास सोपा मार्ग म्हणजे मिरची थोऽऽऽडी खाऊन पाहणे.