पोहे नसते तर माझे काय झाले असते?  

एकवेळ सोन्याआई शिवाय काँग्रेस जिवंत राहिल पण पोह्यांशिवाय मी....  छे कल्पनाच करू शकत नाही मी.  

त्यातून तुम्ही अशी मस्त मस्त प्रकाश चित्रे टाकता...   हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण 
ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे....

सुदाम्याचे पोहे (सौजन्य आंतरजाल)   

कृष्ण आणि सुदामा लहानपणचे मित्र होते. ते एकाच गुरुकडे शिकले. मोठे झाल्यावर कृष्ण राजा झाला. पण सुदामा मात्र गरीबच राहिला. सुदामा नेहमी घरी सांगे, कृष्ण माझा मित्र आहे. तो मोठा राजा असला तरी आम्ही दोघे अजून मित्र आहोत. सुदाम्याच्या बायकोने त्याला सांगितले जा, कृष्णाला भेटून या. सुदामा म्हणाला त्याला द्यायला थोडा खाऊ दे. घरात तर काही नव्हते. शेवटी बायकोने घरातले थोडे पोहे एका कापडात बांधून दिले. सुदामा ते घेऊन द्वारकेला पोचला.   कृष्णाने त्याचे खुप स्वागत केले. त्याला खुप आनंद झाला होता. त्याने विचारले माझ्यासाठी काही आणले की नाही सुदाम्याने लाजत सांगितले, हे पोहे आहेत....