सृष्टीलावण्या,
आम्हा दोघी बहिणींना लहानपणी माझे बाबा रोज एक गोष्ट सांगायचे त्यातलीच ही गोष्ट "सुदाम्याचे पोहे" आठवली एकदम.
ऑर्कुट वर एक समुदाय आहे "वरणभाततूपमीठलिंबू" त्यात एक धागा असा आहे की "असा एक पदार्थ की जो तुम्ही रोज खाल्ला तरी आवडेल...." अर्थातच मी 'फोडणीचे पोहे' लिहिले आहे. पोहे हा पदार्थ असा आहे की एक तर तो पटकन होतो त्यामुळे खूप वेळा केला जातो आणि खरच अजिबातच कंटाळा येत नाही.
त्यातून तुम्ही अशी मस्त मस्त प्रकाश चित्रे टाकता... हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण
ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे....
धन्यवाद!
रोहिणी