मीपण अमेरीकेत जिथे राहते तिथे भारतीय कमी आहेत. गणपती फक्त १ /२ घरात बसवला जातो. मी पण बसवला होता. विसर्जनाचा प्रश्न मलाही पडला होता. इथे विनेबागो नावाचा खुप मोठा तलाव आहे. पण विसर्जनाला परवानगी काढावी लागेल का? कोणी पाहिले तर आक्षेप घेईल का? पोलिस आले तर काय करतील? असे अनेक प्रश्न होते. पण हिय्या करून संध्याकाळी उशीरा अंधार पडल्यावर बाहेर पडलो. विसर्जनाची आरती घरुनच करून निघलो. तलावाचा एक निर्मनुष्य किनारा गाठला. हळुच पाण्यात खोलवर गेलो आणि मुर्ती विसर्जित केलि.
भारतात जोरजोरात आरत्या म्हणत, जोशात केलेल्या विसर्जनाची खुप आठवण आली.