खरोखरच हा 'महाराष्ट्र शासना'चा चांगला उपक्रम आहे. शासन संस्था नेमकं काय काम करतेय ह्याची थोडी-बहुत माहिती इथे मिळू शकते. मला आवडले ते रोजगारासाठीचे 'महाऑप' हे सदर. तिथं रोजगाराच्या कोण-कोणत्या संधी उपलब्ध आहेत ह्याची माहिती देण्यात आलेले आहे.

'आलेख' ह्या सदरात विविध विषयांचे असेल स्टॅटिस्टिकल चार्ट(व्हर्टिकलl, हॉरिझाँटल, ओव्हल)असायला हवे होते / व्हावेत. जेणेकरून आपल्या राज्याची कुठल्या क्षेत्रात, किती, कशी प्रगती होतेय हे ही नागरिकांना समजणे सोपे जाईल. मी  तसा पोचप्रतिसाद /'फीडबॅक' ही दिला.

एकूणच उत्तम काम!