जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे भाषांतर करतो परंतु त्याला कोडे म्हटले की त्यात काही लपवलेले-छपवलेले, ओळखताना विचार करायला लावलेले असावे लागते. काही तुकडे एकत्र जोडून, त्यावर विचार करून सोडवले जाते ते कोडे. ढळढळीत शब्द पुढ्यात ठेवून ओळखा पाहू म्हटले की त्याला कोडे म्हणणे बालीशपणा वाटतो. आपली अनेक भाषांतरे वाचल्यावर माझा प्रतिसाद देताना मला अधिक स्वारस्य कोड्यात होते, भाषांतरात त्यामानाने फार कमी. आता भाषांतर हास्यास्पद असेल तर लक्ष खेचून घेणारच.

भारताची राजधानी दिल्लीला आहे. तर भारताची राजधानी कोणती? - हे कोडे होऊ शकत नाही.

टवाळ भाषांतरे करतात. त्यात वृत्त सांभाळतात, वेगळ्या चाली लावतात. मुखडा छन्न ठेवतात अशा गोष्टींना कोडे म्हणतात असे वाटते.

बाकी, सर्व प्रतिसाद खेचण्याचे प्रयत्न.

विसंगती मान्य करण्यासाठी "दिलाची" गरज असते. काही भाषांतरकार भाषांतर करून सुसंगती सुचवा असेही सुचवतात त्यांचे कौतुक वाटते.  

असो,

भाषांतरावरील आपले प्रेम लक्षात घेता या पुढील भाषांतर "ओळखा पाहू? " असे कोडे घालून गाणे ओळखणारे प्रतिसाद जमवण्यापेक्षा, "भाषांतराचा प्रयत्न - सुचवण्या करा" म्हणून घातले तर सुसंगत वाटेल  असे वाटते. भाषेची जाण असणारे अनेक मनोगती* आहेत ते आनंदाने सुचवण्या करतीलच.

* मी त्या मनोगतींपैकी नाही पण विसंगती जाणवेल इतके तरी मला समजते असे वाटते.