मराठी भाषक?

हल्ली म. टा. मधून व त्या अनुषंगे बरेचजण एक नियम पाळत नाहीत.

मराठीत (संस्कृत मुळे) 'ह्या विषया संबंधीत' असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा विशिष्ट 'साचा' वापरला जातो. तो असा :-

'पहिल्या अक्षराचा पुढचा (नेहमीच दीर्घ) स्वर त्यानंतर शेवटच्या वा शेवटून दुसऱ्या अक्षराला 'ईक' हे प्रत्यय जोडले जाते.

 उदा.

अध्यात्म : 'ह्या विषया संबंधीत' : 'अ' चा 'आ' ,  'त्म' चे 'त्मिक : आध्यात्मिक

मोल : 'ह्या  विषया संबंधीत' : 'ओ' चा 'औ', 'ल' चे 'लिक' : मौलिक

लिंग : 'ह्या  विषया संबंधीत' : 'इ' चा 'ऐ', 'ग' चे 'गिक' : लैंगिक

असे होण्यामागे स्वर कसे बदलतात ह्याचीही जाण असावी लागते. जसे

'अ' चा 'आ', इ व ई चे 'ऐ', उ व ऊ चे 'औ' असे बदलत जातात.

इथं माहिती देण्याचा हेतू एवढाच आहे की असे साचे व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात एखादा नवीन 'साचा' तयार करून आपण वेगळ्या स्तरावरून एखाद्या अर्थाकडे पाहू शकतो. त्यामुळे बोलण्यातील, लिहिण्यातील बरेच शब्द, वाक्य कमी होवून शक्ती व वेळ वाचतील. इंग्रजीत असे विविध 'साचे' आहेत. तसे मराठीत यायला हवेत.