पण ते मान्य करतानाही त्या उर्मटपणे मान्य करतात, याचा राग येतो.

मुलींना याचे दुःख होणे अपेक्षित आहे का?

मुळात स्त्रीत्व, फेमिनाईन कोशंटची आपली व्याख्या काय?

पण नर आणि मादी हा नैसर्गिक फरक उरतोच ना. त्यावर मुली कशा मात करणार?

त्यावर मात कश्यासाठी करायची? स्त्रीपुरुष समानता म्हणजे कुणी कुणावर मात करणे नव्हे तर दोन्ही प्रकारच्या मानवांना समान अधिकार, संधी, वागणूक मिळावी असे आहे. ती सध्यातरी मिळताना दिसत नाही. हा(ही) या लेखाचा विचार आहे असे मला वाटते.

विक्रम, लेख आवडला. कामाच्या तासाबाबत एकंदरित मुली व मुले यांत संघर्ष नसून लवकर काम उरकून पळणारे, काम न उरकता लवकर पळणारे, अहोरात्र कामाच्या ठिकाणी राहून सावकाश काम करणारे आणि अहोरात्र कामाच्या ठिकाणी राहून दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर अनेक कामे करणारे या चार प्रकारात वरिष्ठ वर्गाला पटकन फरक करता येत नाही ही समस्या आहे. तरी एकंदरित मुलगी म्हणून लोकांचा दृष्टीकोन पुष्कळदा पूर्वग्रहदूषित असतोच.