लेख उत्तम लिहिला आहे. अगदी मुद्देसूद व मूळ विषयापासून अजिबात न ढळता. असेच विविध विषयांवर लिहावे.

पद्यानुवाद लोकांना नको असतात का?

याचे ढोबळ उत्तर देणे कठीण आहे. संस्कृत तसेच इतर सहसा न समजणाऱ्या भाषेतल्या पद्याचे, कवितांचे अनुवाद कवितेच्या रसिकांना जास्त आवडण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेतील गाणी, कविता सहसा थेट आस्वादता येतात, त्यामुळे त्यांच्या मराठी अनुवादाबद्दल निरुत्साह दिसत असावा. बाकी विनोद म्हणून भाषांतरे लोकप्रिय आहेतच.

मी काही दिवसांपूर्वी पुलंनी अनुवादलेली रविंद्रनाथांची काही गीते, कविता वाचल्या. अगदी १/ २ मस्त वाटल्या. बाकी 'यात काय कविता' अशी भावना झाली. रविंद्रनाथ व पुलं आपापल्या क्षेत्रात दिग्गज खरे, पण कविता, पद्ये हे असे नाजूक क्षेत्र आहे की भट्टी बिघडण्याचीच शक्यता ९९%.