नव्या शतकात श्यामसारखा कोमल मनाचा मुलगा जन्माला आला किंवा कोमल मनाची मुलगी जन्माला आली तर

श्याम काही जन्मापासून संस्कार घेऊन आलेला नव्हता. उलट वेळोवेळी आईवडिलांचे न ऐकणारा, कधी बापाच्या अवताराची लाज वाटणारा तर कधी पंक्तीत श्लोक म्हणण्यास लाजणारा असा नेहमीचा मुलगा होता. तेव्हा अचानक श्याम जन्माला येईल अशी काळजी नसावी.

हल्ली गुरुजनांचा, मातापित्यांचा आदर नाही असे मला वाटत नाही. आदरणीय गुरुजनांचा, ज्यांना ते का आदरणीय आहेत हे समजते त्यांच्याकडून, आदरच केला जातो. परंतु मला जे आदरणीय आहेत ते तुम्हालाही असावेत असा अट्टहास अनाठायी; आत्ता काय किंवा पूर्वी काय. फारतर आदर व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे असे म्हणता येईल. उदा. पूर्वी वाकून नमस्कार असेल तर आता भेटकार्डे.

सध्याच्या काळात संवेदनाक्षमतेची उलट चलती आहे असे मला वाटते. विविध वाहिन्यांचे 'वास्तवदर्शी' (रीयॅलिटी) कार्यक्रम लोकांच्या संवेदनाक्षमतेच्या भांडवलावरच चालतात.

दरेक पिढीत बावळटपणा व बेफिकिरीची नवी नवी व्याख्या असते. ती नेहमीप्रमाणे थोडीफार बदलत राहणार इतकेच.