नव्या शतकात संवेदनाक्षम मन घेऊन जगणे शक्य आहे?
संवेदनक्षम मन असावयास हरकत नाही. पण घळेपणा नको. संत म्हणालेच आहेत, मऊ मेणाहून आम्ही
विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऐसे ।।
प्रसंगी मन कर्तव्य कठोर करता आले पाहिजे. गीतेत जेव्हा अर्जुन म्हणतो, आप्तजन पाहून शरीर कंप पावत
आहे, गात्रे कोरडी पडत आहेत. त्यावेळी श्रीकृष्ण ठणकावतो, हे पार्था भ्याडपणा टाकून दे, हे क्षुद्र
मनोदौर्बल्य टाकून युद्धाला तयार राहा. युद्ध करायचेच हा निश्चय कर.
मला वाटते, साने गुरुजी कोमल मनाचे होते पण त्यांना वेळ प्रसंगी कठोर होता आले नाही. गीतेचा संदेश
ते विसरले आणि म्हणूनच त्यांना आत्महत्येच्या मार्गाने जावे लागले.
डर नही है धूर्त दुनिया के कपट का, घात का, नयन मे ध्रुव ध्येय अनुरुप ही दृढ भाव भर, ले चले हम राष्ट्र
नौका को भंवर के पार कर...