सर्वांना परत एकदा भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
झंडूबाम,
पुढच्या वेळी लघुकथा लिहीण्याएवढा वेळ काढायचा नक्की प्रयत्न करीन. पण तुमचे उर्मटपणाविषयीचे म्हणणे अगदी अमान्य. तुम्ही अनुभवलेला उर्मटपणा हा कदाचित त्यांचा व्यक्तिगत अहंकार असु शकेल. पण त्याच थेट जनरलायझेशन नाही करता येणार.
मृदुला,
स्त्रीपुरुष समानतेविषयी तुमचे म्हणणे अगदी बरोबर. लेखाचा विचार तुम्ही अगदी समर्पकपणे टीपला आहे. याबरोबरच लोकांचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन मांडायचा हेतू होताच.
कामाच्या प्रकारात फरक करणे ही तशी अवघड गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणच्या कामाच्या मुक्त आणि उदारमतवादी वातावरणात असा फरक करणे खरोखरचं अवघड होऊन बसते. एक टिम लीड या नात्याने मी या समस्येचा अनुभव घेत आहे.
स्त्रीपुरुष समानतेच्या संदर्भात, स्त्रीमुक्ती आणि पुरुषी अहंकाराविषयी भालचंद्र मुणगेकरांचे लोकरंगमधे (रवि. २१ सप्टें. २००८) वाचलेले वाक्य खुप महत्त्वाचे वाटले. ते असे: "...स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार करतो तेव्हा मला सतत प्रश्न पडतो की स्त्रीला मुक्त करणारा पुरुष कोण? खरा प्रश्न व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून आणि स्त्रीला दुय्यम स्थान देऊन शेकडो वर्षे जोपासलेल्या अहंकारापासून पुरुषाने मुक्त होण्याचा आहे."