रोज कानावर आदळणाऱ्या चुकीच्या वाक्यरचनेतील हे एक वाक्य. हिंदीमध्ये "जागा ! ग्राहक जागा !" असे म्हटले तर "ग्राहक जाग गया है" असा अर्थ होतो. मराठीत येताना त्या धर्तीवर "ग्राहक झाला जागा" असे हवे. वा जाहिरातीचे सूत्र पकडून "जाग, ग्राहका जाग !" असे तरी किंवा "जागा हो, ग्राहका जागा हो." असे तरी हवे.
येऊन जाऊन ती आहे सरकारी जाहिरात ! त्यामानाने बाकी जाहिरात खरोखरच चांगली आहे!! पूर्वी एक सरकारी जाहिरात नेहमी ऐकू यायची - जन्म मृत्यू नोंदणी विषयी. वडिलांच्या मृत्यूची नोंद वेळेवर न केल्यामुळे कसे त्रास होतात ते सांगून झाल्यावर निवेदिका म्हणायची -"पुन्हा ही चूक करू नका !"