माझी गल्लत झाली. पण ती होण्याला आजकाल वापरात येणारे चुकीचे शब्द व वाक्यरचनाच हेच जबाबदार आहेत. 'महान्यूज : महाराष्ट्र सरकारचे वेबपोर्टल' ह्या विषयावरच्या लेखना मध्ये संग्राहक ह्यांनी लिहिलेला 'मराठी भाषक' हा शब्द प्रयोगच योग्य आहे.
'भाष' - (वचन, बोली) ह्या पासून 'भाषा' व हि भाषा बोलणारा 'भाषक' किंवा 'भाषी' व त्याचे भाववाचक नाम 'भाषण'.
तसेच 'भाष्य', 'भाष्यकार', 'भाषित', भाषांतर, 'भाषावार' असे इतर शब्द हि आमच्या घरच्या (स. न. १९६० च्या आसपास छापलेल्या) शब्दकोशात सापडले (मला ही ते माहीत होतेच) पण त्यात 'भाषिक' हा शब्दच सापडला नाही. 'भाषिक' ह्या शब्दाचा अर्थ वेगळ्या संदर्भात घ्यायला हवा. आणि त्यासह ''भाषिक' म्हणजे भाषा बोलणारा असा अर्थ घेणं चुकीचं आहे' असं माझं मत आहे.