प्रकट चे प्रकटीकरण म्हणजे काय? संगणक चे संगणकीकरण म्हणजे काय? खर तरं शाळेत हे सर्व करणं, म्हणजे प्रत्यय लावून नवा शब्द तयार करणं चित्रांच्या माध्यमातून शिकवले जायला हवे.
मराठीच्या व्याकरणात हे सारे शिकवले जाते? मला तरी माहीत नाही. किंवा शाळेत शिकवल्याचेही स्मरत नाही. मुळात मराठीचं व्याकरण हे बहुतांशी प्राचीन भाषा 'संस्कृत' च्या व्याकरणावर अवलंबून आहे. संस्कृत चे अभ्यासकच तुम्हाला काही मदत करू शकले तर.
मराठीच्या व्याकरणकारांनी निव्वळ मराठीचा विचार करून व्याकरणाचे नियम बांधायचे व ते सोप्या शब्दात व्यक्त करण्याचे धाडस अजून तरी केलेले नाही. मला तरी व्याकरण (शब्दनिर्मितीच्या बाबतीत) म्हणजे शब्दरूपी विटा पाडणारा साचा असावा असे वाटते. जेवढे विद्यार्थ्यांचे व्याकलन (व्याकरणाचे आकलन) चांगले तेवढे शब्दसंग्रह व शब्दांचे अर्थग्रहण चांगले होवू शकते असे मानतो.
मराठीच्या व्याकरणकारांनी फक्त संस्कृत, इंग्रजीचा अभ्यास करायचा व त्यायोगे मराठी भाषेला त्या अभ्यासाशी जोडत नियम कागदावर शब्दबद्ध करत जाणं यालाच व्याकरणाचा अभ्यास समजला. त्याच्या ह्या लिखाणालाच अजूनपर्यंत तरी मराठीचे व्याकरण समजले जाते. पण ते विद्यार्थ्यांना किती समजते ते कूणीही ध्यानात घेत नाही.