मला वाटतं, भाषकमध्ये यापलिकडे अर्थछटा आहे. 'भाषक' म्हणजे नुसती एखादी भाषा बोलणारा नव्हे तर ज्याची ती मातृभाषा आहे ती व्यक्ती किंवा समुदाय. मी हिंदी अथवा इंग्रजी बोलू शकत असलो व वेळप्रसंगी बोललो तरी मी हिंदी भाषक वा इंग्रजी भाषक होत नसून मराठी भाषकच राहातो. दुसरं म्हणजे, 'भाषक' हा शब्द अधिकतर व्यक्तिपेक्षा समुदायाविषयी वापरला जातो, समुदायवाचक नामाप्रमाणे.

भाषिक म्हणजे भाषेशी कोणत्याही रीतीने संबंधित.