आताशा असे वाटते कि संवेदना हा प्रकार माणसांमध्ये जिवंतच राहीला नसावा. नाहीतर ईतके सर्रास हे प्रकार घडले नसते. हल्लीच्या युगात माणसाला माणसाच्या जीवाची काही किंमत राहीलेली नाही आणि त्यामध्ये लहान शाळेत जाणाऱ्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. शिक्षणाचा उपयोग नक्की कशासाठी होतो आहे आणि आपण खरोखर प्रगतीकडेच वाटचाल करतो आहे ना ? हे प्रश्न अजूनही अनिर्णितच आहेत.