भाषक म्हणजे नुसती भाषा बोलणारा नव्हे तर ती ज्याची मातृभाषा आहे तो, हे श्री. मिलिंद फणसे यांचे मत योग्य वाटते.
'भाषिक'च्या अर्थाबद्दल कुणाचे मतभेद नाहीत..
आता 'च्वि' बद्दल:- संस्कृत 'च्वि' प्रत्यय 'जे वास्तविक नाही ते' दाखवण्यासाठी उपयोगात येतो. गुंतागुंतीचे गणित सोडवताना शकुंतला देवींच्या मेंदूचे संगणकीकरण होत असे. शिवाजी तुकारामासमोर श्रोत्यांमध्ये बसलेला असताना, मोंगल शिपाई त्याला शोधायले आले तेव्हा, सर्व श्रोत्यांचे शिवाजीकरण झाले. तसेच रासक्रीडेच्यावेळी गोपांचे कृष्णीकरण होत असे. यांतली 'करण'रूपे..
तेन तुल्यं क्रिया चेद्वतिः । तत्र तस्येव । तदर्हम् । पाणिनी ५.१.११५-११७. शिवाय, कृभ्वस्तियोगे संपद्यकर्तरि च्विः । ---पाणिनी ५.४.५०. म्हणजे कृ, भू आणि अस् या धातूंपूर्वी च्विप्रत्यय लागतो.
पण आता वर वर्णन केलेले प्रसंग कधी घडणार? त्यामुळे हल्लीच्या प्रकटीकरण, डांबरीकरण, आणि बँकाचे संगणकीकरण या प्रयोगांनाच 'च्वि' म्हणायचे की कृदन्ते ते बघावे लागेल. मला वाटते भाषकमधला 'क' कृदन्त आणि भाषिकमधला 'इक' तद्धित प्रत्यय असावेत.