हा शब्द ओळखीचा वाटतो, पण अर्थ लागत नाही. 'उसंडु' नाही ना?
मुळात सह्याद्रि वाहिनीतला 'द्रि' ऱ्हस्व पाहिजे. सह्याद्री आणि वाहिनी हे दोन शब्द उच्चारसौकर्यासाठी वेगवेगळे लिहिले तरी तो मुळात एक समास आहे. आणि ह्या दोन्ही शब्दांचे, एकत्रित उच्चारण होते आणि ते सह्याद्रि-वाहिनी असेच होते. सह्याद्रीऽऽवाहिनी असे होत नाही. आता नावातच जिथे चूक तिथे आणखी काय असू शकते? (तरीसुद्धा सह्याद्रिवाहिनीवर इतर वाहिन्या व मटा पेक्षा फारच कमी चुका असतात.)