माझ्या लहानपणची गोष्ट. सारसबागेत 'झाडाची पाने फुले तोडून शोभा कमी करू नये' अशी पाटी लावली होती. कुणातरी व्रात्य मुलाने त्यातला कमी खोडून टाकला आणि 'झाडाची पाने फुले तोडून शोभा करू नये' असे केले.
त्याचा फोटो पेपरात आला होता. तो मी माझ्या एका मुंबईच्या नातेवाइकाला दाखवला. त्यावर तो विनोद चांगल वाईट म्हणायच्या ऐव्जी तो म्हणाला , "जे नियम राबवून घेतायेत नाहीत ते करावेतच कशाला. पण ह्या पुण्याच्या लोकांना कोण शिकवणार अक्कल! "
असो.