काही आधुनिक तंत्रज्ञानामुळे (वेब कॅमेरे, स्टींग ऑपरेशन, सतत बातम्यांच्या आणि नेते अभिनेत्यांच्या मागे मागे असणाऱ्या वृत्तवाहिन्या वगैरे, वेबसाईट्स वर ऑनलाईन अर्ज करणे) भ्रष्टाचाराने पैसा मिळवण्याचे काही मार्ग बंद जरूर झाले, पण त्यातून पळवाटा निघून वेगळ्या स्वरूपात वेगळ्या मार्गाने भ्रष्टाचार पुन्हा फोफावू लागला. कमी तर नक्कीच झाला नाही.
जोपर्यंत भारतातली लोकसंख्या कमी (आटोक्यात, नियंत्रणात) होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होण्याची सूतराम शक्यता नाही.
नोकरीच्या जागा कमी, अर्ज जास्त
जाती-धर्म-भाषा भिन्नता असल्याने क्लिष्टता अधिक. त्यामुळे प्रत्येकाची अस्तित्त्वाची धडपड. त्यात भ्रष्टाचाराला वाव.
भ भारताचा आणि भ भ्रष्टाचाराचा...
भ्रष्टाचार आणि लोकसंख्या भारतात कधीही कमी होणार नाही. वाढतच जाईल. खोटा अशावात बाळगून उपयोग सुद्धा नाही आणि त्याने भलेही होणार नाही.