चौकस,
कथेतील उपमा खासच आवडल्या.
कथा गंभीर वाटावी अशी लेखकाची अपेक्षा असावी असे न सांगता कळत असले तरी का कोण जाणे 'दारू प्यायल्यावर भुकेचेच नव्हे तर सगळेच अंदाज बऱ्याच वेळेला चुकतात.' या मायाकुमारच्या वाक्यानंतर खुद्द मायाकुमारचे सायनाईडने मरणे एकदम कॉमिक वाटले मला. हहपुवा झाली माझी अगदी त्याबद्दल क्षमस्व.
काही चुका मात्र फक्त मला वाटत आहेत की त्या खरेच आहेत ते पाहावे लागेल ज्या पुढीलप्रमाणे -
विसळणे हे क्रियापद वस्तूंसाठी वापरले जाते.. 'हात विसळणे' हा शब्दप्रयोग किमान मलातरी चुकीचा वाटला. हा शब्दप्रयोग बरोबर असल्यास गंमतीने उद्यापासून आंघोळ म्हणण्याऐवजी अंग विसळणे असे म्हणेन !
भाकरी तव्यावर टाकल्यानंतर तीवरून पाण्याचा हात लगेच फिरवावा लागतो नसता भाकरीला फोड येतात जे नंतर पाणी फिरवायला गेल्यास दबले तर जातात पण मग भाकरी फुगत नाही. तुमच्या वर्णनात पाणी फिरवायला खासाच उशीर झालेला दिसतोय मायाकुमारला आणि तरीही भाकरी फुगली म्हणजे मायाकुमारच्या मायेला खरेच तोड नाही. ना?
कथेतील अत्यंत आवडलेला परिच्छेद म्हणजे -
"ताडमाड उंच बापाला धोतर अपुरे पडून जर पोटऱ्या उघड्या पडत असलीत, तर त्याच्या बुटबैंगण मुलाने पोटऱ्या उघड्या टाकण्याकरता धोतर निम्मे करून नेसावे हे आणि असे यांचे प्रस्थापित शहाणपण. पण मग त्या वंशात पुन्हा कुणी उंच पुरुष निपजला तर निम्म्या केलेल्या धोतराने त्याच्या पोटऱ्याच काय, मांड्याही उघड्या पडतील याची कुणाला जाणीव आहे का? मग ही जाणीव झाली म्हणून माझ्या अपेक्षा अवास्तव? "
पुलेशु.