दु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले
शोधीत आसरा ते मजसारखेच होते
छान...
दुःख माझे माझियापाशी असू दे
ते बिचारे एकटे जाईल कोठे?
कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेतील या ओळींची आठवण देऊन गेला हा शेर. फारच छान.
हे काय आज त्यांना आले हसू नव्याने
माझे फजीत होणे तर कालचेच होते
वा... वा... वा...
सुंदर शेर....वेगळाच विचार...
झाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले
असा यतिभंग शक्यतो टाळता आल्यास पाहावे. टाळावाच :)
सतीशराव, गझल तुमच्या बाहूंत हळूहळू येत आहे तर!!! खूप आनंद झाला तुमची ही गझल वाचून. मनापासून शुभेच्छा.