अनंतराव, मनोव्यथेचे सुरेख, काव्यरूप सादर केले आहेत. छान!

मात्र तिथे राहणारे लोक शेजार, स्नेह, विरंगुळा, समाधान आणि मातृभूमीसानिध्य हे सारेच मिळवत असणारच की.

आपण तिथे दुरून गेलेले लोक जर त्या मातीशी समरस होऊ शकलो नाही तर मात्र तुम्ही म्हणता तशी भावना उद्भवू शकते.

तेव्हा,

शेजार शोधा, स्नेह शोधा, शोधा खरा विरंगुळा ।
कर्मदेशी सौख्य शोधा, बोध घ्या तुम्ही आगळा ॥
वाईट आपला देश ना, वाईट ना ती अमेरिका ।
पिंडीचा संकोच सोडा, ब्रह्मांडी नाही सौख्य का? ॥