चित्रपटात नायक / पोलिस दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी ज्या कल्पना वापरतात त्या अत्यंत अशक्य आणि अचाट दाखवतात, ज्यावरून कुणी प्रेरणा घेतली तरी उपयोग नाही. मात्र खलनायकाच्या युक्त्या, क्लूप्त्या या नेहेमी अधिक परिणामकारक आणि वास्तववादी दाखवतात. (काही अपवाद वगळता)

जसे, एक हसीना थी यात उर्मिला सैफ चा बदला घेते ते अधिक वास्तववादी पद्धतीने दाखवले आहे.

मात्र, कसूर मध्ये आफताब मुलींना ज्या पद्धतीने फसवतो, ते अधिक परिणामकारक आणि ' मार्गदर्शक' पद्धतीने दाखवले आहे, मात्र लिझा रे ज्या पद्धतीने शेवटी बदला घेते ते वास्तवात शक्य नाही.

जसे धूम टू मध्ये हृतिक च्या युक्त्यांवर जेवढा भर दिला गेलेला आहे तेवढा भर, पोलिस त्याला पकडतांना काय युक्ती करतात ते दाखवतांना दिल गेलेला नाही.

हेच मला म्हणायचे आहे. आणखी काही पैलू असतील तर ते कृपया सांगावे.