चालनारजे जे पोलिसांना समजले ते ते लगेच बातम्यांतून जाहीर करण्याची गरज आहे का? यातून दहशतवाद्यांना आपला प्लॅन, मार्ग बदलण्यास मदतच होते. काय वाटते आपल्याला?
अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. अनेकांनी वृत्तपत्रातून हा मुद्दा समोर आणला आहे. पण त्याचा काही उपयोग होत नाही. बहुतेक हिंदी वृत्तवाहिन्या असा आगाऊपणा करतात. पण त्यांच्या पर्यंत ही बातमी पोहोवलीच का जाते? कधी कधी अतिरेक्यांची दिशाभूल करण्यासाठी बातम्या प्रसृत करता येतील पण तसे करून काही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
असे दिसून आले आहे की दहशवाद्यांना अधिकाधिक प्रसिद्धी हवी आहे. ते जे काही ई-मेल करतात तो या वृत्तवाहिन्या त्यांचे जणू प्रवक्ते असल्याप्रमाणे सविस्तरपणे जाहीर करतात. यामुळे अतिरेक्यांना जे हवे आहे ते साध्य होते. त्यांना आपला उद्देश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदतच होते. अतिरेक्यांचा संदेश सांगत सुटता तर त्यांना उत्तर पण द्या की! म्हणे गुजरात दंगलीचा बदला म्हणून बॉम्बस्फोट. ही एकतर्फी बातमी का? मालेगाव, हैदराबाद, समझौता एक्सप्रेस मधील स्फोटात जे मुस्लिम मारले गेले त्यांच्या वेदना तुम्ही दाखवा ना. ते या वृत्तवाहिन्या का नाही करत? विचारा त्या अतिरेक्यांना जाब की हे मारले गेलेले तुमचे मुस्लिम बांधवच होते ना? पण नाही .. यांची तोंडं फक्त हिंदूं विरोधातच बोलणार..
पोलिस जी काही शोध मोहिम हाती घेत आहेत ती त्यांना तडीस नेऊदेत. वृत्तवाहिन्या अकारण घाई घाईने बातम्या देऊन अतिरेक्यांच्या साथीदारांना एकप्रकारे सावधच करत असतात.