प्रकाशनविश्व दरवर्षी निघते, बहुधा १ जानेवारीला. त्यांचे संकेतस्थळ अजून चालू झालेले नाही. पण प्रकाशकाचा पत्ता:- प्रकाशनविश्व, सी १२, हर्षदा गार्डन, महागणेश कॉलनी, पौड रोड, पुणे ४११०३८. फोनः ०२०-२५३८३१९०.
या पुस्तकात गेल्या वर्षात प्रसिद्ध झालेल्या बहुतेक सर्व पुस्तकांची नावे, तसेच लेखक, मुद्रक, प्रकाशक, चित्रकार, मुद्रितशोधक, पुस्तकविक्रेते, जाहिरातसंस्था, व्याख्याते, इत्यादींची गावोगावची यादी असते. पुस्तक ५००हून अधिक पानांचे असते. पुस्तकाच्या प्रकाशनाला लागणाऱ्या कागदापासून ते बाइंडिंगपर्यंतच्या सर्व गोष्टींची परिपूर्ण माहिती प्रकाशनविश्वात असते. वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या चांगल्याचांगल्या पुस्तकांच्या भरपूर जाहिराती असतात. हे पुस्तक दरवर्षी घ्यावे आणि संग्रही ठेवावे. -अद्वैतुल्लाखान