कपोलकल्पित नाही, प्रत्येक शब्द खरा आहे. आजही ही माऊ माझ्याकडे आहे. मात्र एव्हढे सगळे आजार
होऊनही आज ती माऊ जिवंत आहे ह्याचे सगळे श्रेय सरकारी पशुरुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांना आहे.
मी असे ऐकले आहे की शिवाजी पार्क जवळपासचे खाजगी डॉक्टर प्राण्यांना नुसते हात लावायचे रु. ५००/-घेतात पण ह्या माऊवरील आतापर्यंतचा खर्च औषध व उपचार धरून सुद्धा रु. 3००/- पेक्षा कमी झाला आहे.
फक्त मला पशुरुग्णालयापर्यंत टॅक्सीने जायचा यायचा खर्च अनावश्यक वाटतो ; ) मग तिला सॅकमध्ये टाकते,
सॅकचे बंद लावत नाही आणि सॅक पोटाशी धरून जाते आपल्या २०० क्रमांकाच्या बेस्ट बसमधून :) गुपचुप.