सारातोव्हच्या गणेशोत्सवाचा अहवाल आवडला. कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक वाटले. भारताबाहेर गेल्यावर, मला वाटते, असे उत्सव आपली राष्ट्रीय एकपणाची भावना घट्ट करण्यात मोठाच हातभार लावत असणार. शिवाय, घरी नसल्याची टोचणी थोडी कमी होत असेल. आणि मुख्य म्हणजे अश्या कार्यक्रमांच्या संयोजनाचा उपयुक्त असा अनुभव मिळत असणार. एकंदरित दरवर्षी सारातोव्हला गणेशोत्सव होत राहो अश्या शुभेच्छा!

छायाचित्रे पाहिली. त्यात एस्कॉनवाल्यांखेरीज आणखी गोरे लोक दिसले नाहीत. अश्या उत्सवात स्थानिक मित्रमैत्रिणींना बोलावून पाहावे असे एक सुचवावेसे वाटते.

मला नाही वाटत इथे एव्हढ्या मोठ्या व्होल्गा नदित एक छोटासा गणपती विसर्जित केला तर पर्यावरणाला काही हानी होईल.

थेंबे थेंबे तळे साचे. थोडीशी का होईना हानी होईलच. आपल्याकडून कमीत कमी हानी होईल असे पाहावे, इतकेच.