पूर्वी त्याचे कांगारू झाले होते,  पुढचे पाय आखुड आणि पाठचे पाय उंच.  आता हळूहळू गाडी पूर्वपदावर येते आहे 
पण अजुनही थोडेसे पाठीला पोक आहे आणि बरेचदा उडी मारल्यावर दोन्ही पाठचे पाय फाकतात.  पोकाड 
मावशीकडे पाहून वाईट वाटते.  

बाकी डोळे मात्र छान आहेत त्याचे, हिरवे जर्द आणि कान सतत तीक्ष्ण. पण त्याला कोणाचीही शिकार करता येत 
नाही.  क्वचित् झुरळं पकडते.