माझ्या मिसळण्याच्या डब्यात भारतात असताना
मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, गोडा मसाला
अमेरिकेतल्या मिसळण्याच्या डब्यात
मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, धनेजीरे पूड, जिरे, गरम मसाला असतो.
भारतात असताना मी घरी गोडा मसाला करायचे तेव्हा इतर मसाल्याची फारशी गरज भासत नसे. इथे आल्यावर घरचा गोडा मसाला नसल्याने बाकीच्या मसाल्याची गरज भासू लागली व त्यामुळे वापरायला लागले.
सृष्टीलावण्या,
स्वयंपाकातील या प्राथमिक गोष्टी आहेत, त्यामुळे यावर चर्चा अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते. धन्यवाद!!
मसाले आणि तेही घरी केलेले, त्याची उपयुक्तता, स्वाद यावर सुद्धा बरीच चर्चा होऊ शकेल आणि ती सर्वांनाच उपयुक्त ठरेल. माझ्या माहितीत घरी करण्याचे मसाले खालीलप्रमाणे
१. गोडा मसाला
२ . काळा मसाला
३. गरम मसाला
४. मुगाच्या डाळीच्या खिचडीत घालायचा मसाला
५. सांबार मसाला
६. चहाचा मसाला
७. लोणच्याचा मसाला
अजून कोणाला आठवत असतील तर लिहा.
परत एकदा अनेक धन्यवाद!