गाडगेबाबा हे कसे लोकसंत होते त्याची आठवण.

देवलाली कॅंप नावाचे नाशिक जवळ लहानसे गाव आहे. तेथे एका तयार पोषाखाच्या दुकानाचे कापड दुकान आहे. त्या दुकानाचे उद्घाटन बाबांच्या हस्ते झाले होते. ( १९५५ च्या सुमारास). ते दुकान आजही चालू आहे. त्यात हे छायाचित्र आजही आहे.

बाबांचा वावर कोणत्या आणि किती क्षेत्रात दुर आणि खोलवर असा होता अशी कल्पना यावरून येऊ शकते.

मी लहान असताना ( ७५ च्या सुमारास) माझे वडिल नाशिकला गाडगेबाबा च्या धर्मशाळेत दर महिन्यात एक पंगत देत असत. त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे त्याचा खर्च ३०० रुपये असावा. हा उपक्रम बराच काळ चालू होता. भाऊ ( वडिलासाठीचे संबोधन) बाबाच्या धर्मशाळेत जायचे असेच म्हणत असत. त्यामुळे बाबा म्हणजे आपल्या घरातील आहे असे वाटायचे आणि आजही तसेच वाटते.

महाराष्ट्राच्या भाग्याने महाराष्ट्राला तीन बाबा मिळाले, एक म्हणजे गाडगेबाबा, दुसरे म्हणजे बाबा( साहेब) आंबेडकर आणि तिसरे म्हणजे बाबा आमटे.

मराठीमाणसाला या तिघाच्याही ऋणात आणि स्मृतीरंजनातच रहायला आवडेल.