महाराष्ट्राच्या भाग्याने महाराष्ट्राला तीन बाबा मिळाले, एक म्हणजे गाडगेबाबा, दुसरे म्हणजे बाबा (साहेब)
आंबेडकर आणि तिसरे म्हणजे बाबा आमटे.

हे तिघे केवळ महाराष्ट्रालाच मिळालेले देणे नव्हे तर अवघ्या मानवतेला मिळालेले देणे आहे.   आज ही मला
कोणी म्हणाले की बाबासाहेब हे आमचे नेते आहेत तर मी म्हणते ते आपले सर्वांचे नेते आहेत, सर्वांचे बाबा
आहेत. ते आणि ज्योतिबा अशी मंडळी नसती तर एक स्त्री म्हणून मी कदाचित् जन्मभर अशिक्षित राहिले असते.