मेथी म्हणजे मेथीची भाजी करायचा पाला. फेनुग्रीक, ट्रिगोनेला फीनम-ग्रीकम्.
मेथा: एका जाड पानाच्या मेथीचा पाला. रानमेथी. याला काही लोक घोडामेथी म्हणतात. ही घोड्याला खायला घालतात. चांगली मेथी बाजारात नाहीच मिळाली तर हिचीच भाजी करावी लागते. हिंदीत चनिहारी. वाइल्ड फेनुग्रीक, ट्रिगोनेला पॉलिसेराटा.
कसूरी मेथीः अगदी बारीक पानाची मेथी किंवा तिचा वाळवलेला पाला. हिंदीत चमामेथी. ट्रिगोनेला कॉर्निक्युलाटा. साध्या मेथीची वाढ भराभर होते आणि तिचे वीत दीड वीत उंचीचे खोड ताठ असते, तर कसूरी मेथी सावकाश वाढते आणि जास्त फांद्या फुटून बुटकीच राहते. साध्या मेथीची फुले पांढरी तर हिची भडक पिवळी नारिंगी असतात.
मेथीदाणाः मेथीचे बी.
मेथ्याः मेथीदाणे.
भजीः 'भजे'चे अनेकवचन.
भज्याः 'भजी'साठी ग्रामीण शब्द. 'भजे'चे प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप.