वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे तपशीलाचे वर्णन तुम्ही अगदी झकास करता.
यच्चयावत सगळे पर्यावरणवादी एका फ्लायओव्हरला विरोध करण्यात गुंतले होते, त्यामुळे इकडे कुणाचे लक्ष गेले नाही.
पाऊस पडण्याची शक्यता ही कुठल्याही राजकारण्याने पक्ष बदलण्याच्या शक्यतेइतकीच एकाच वेळेस तेजतर्रार आणि मलूल होती.
कारण कितीही सुधारणा झाल्या असल्या तरी अजूनही पोलिस ठाण्यातल्या कच्च्या कैद्यांना आगपाणी मिळत नाही.
ही वाक्ये फार धारदार आहेत. कुठूनतरी आतून आलेली आहेत असे वाटते.
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन.
-श्री. सर. (दोन्ही)