चहा हा त्याच्या चवीसाठी घेतला जातो हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. मी स्वतः चहाच्या चवीबाबत खूप चिकित्सक आहे. चहाची पावडर व चहाची पिशवी यांच्या चवीत फरक आहे हेही तितकेच खरे. भारतात असताना गोकुळचे दाट दूध व tetly ची चहा पावडर म्हणजे स्वर्गसुख होते. परंतु या इलेक्ट्रीक शेगडीवर चहा करणे म्हणजे एक कंटाळवाणे व कटकटीचे काम आहे. इथे पण चहा पावडर वापरलेली आहे पण चवीत फरक नाही. याचे कारण चहाची चांगली चव येण्यासाठी जशी चहा पावडरची आवश्यकता आहे तशीच चांगल्या दूधाची पण.
त्यामुळे बरेच प्रयोग करून शेवटी lipton च्या टी बॅग्ज मला जास्त चांगल्या वाटल्या. प्रयोग म्हणजे चहाची पावडर वापरून तो इलेक्ट्रीक शेगडीवर व मायक्रोवेव्ह वर करून पाहिले. टी बॅग्ज वापरूनही शेगडी व मायक्रोवेव्ह करून पाहिले. शेवटी वेळ व कष्ट वाचतात आणि शिवाय चवही बरीच चांगली येते ही खात्री झाली तेव्हापासून गेली ३ वर्षे वर दिलेल्या पद्धतीने व मापाने चहा पीत आहोत.
पिशवीतला चहा जर पाणी+दूध या मिश्रणात व्यवस्थित उतरला तर चांगली चव येते.
शेवटी चहाची चव व चहाची तल्लफ येणे हे चहाबाज लोकांनाच जास्त माहिती. मी पण त्यातलीच एक.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार सोंगाड्या.