आपले वापरायचे नांव काय घ्यायचे ती ज्याची त्याची स्वतःची निवड आहे.
तुम्ही म्हणता त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही, पण एक नमूद करावेसे वाटते की येथे बहुतांश सदस्यांनी आपापली नांवे देवनागरीतच लिहिली आहेत. ज्यांनी रोमनमध्ये लिहिली आहेत, त्यांच्यापैकी काहीजणांच्या संगणकावर लीप्यंतराची ऍप्लेट कार्यान्वित होण्यात काही तात्कालिक अडचण निर्माण झाली असण्याची शक्यता आहे, कारण कित्येकांनी नंतर येऊन आपले नांव देवनागरीत बदलल्याचे दिसते. काहींनी मात्र त्यांची नांवे त्यांच्या इतर संगणकीय कामाशी सुसंगत अशी निवडण्याचे ठरवल्याने ती रोमनमध्ये असण्याला पर्याय नाही असेही झाले असेल.