एकेकाच्या हाताची म्हणून अशी एक वेगळीच चव असे आपण पाक कृतीच्या बाबतीत अनेकदा म्हणतो, ते चहाच्या बाबतीत प्रकर्षाने अनुभवास येते. एकाने केलेल्या चहातील घटकांचे प्रमाण तंतोतंत तसेच वापरून दुसऱ्याने चहा केला तरी तो तसाच होईल याची शाश्वती नसते. अर्थात् व्यावसायीक चहावाले याला अपवाद असू शकतील.