काय? कालिदास वगैरे वाचता की काय तुम्ही?

लक्षामध्ये राहिला तो फक्त "स्नेह" तोदेखील जडला समोर दिसणाऱ्या अजाण, गोंडस, निष्पाप, पुष्पाप्रमाणे नाजुक करकमल असणाऱ्या, निशेच्या आशीर्वादाने वर्ण प्राप्त झालेल्या, पवनसुताच्या पुष्टाशी लांबीमध्ये स्पर्धा करणाऱ्या घनदाट केशांची माळ मस्तकी धारण करणाऱ्या, कळीला आनंदाने उमळण्यास प्रोत्साहित करणारे, परिसराला प्रफुल्लित आणि रोग्याला आमयमुक्त करणारे स्मित,  गोड मधाने तुडुंब भरलेल्या मधमाश्याच्या पोळ्याप्रमाणे नरम रसभरित आणि  गुलाबाच्या पाकळीप्रमाणे नाजूक पद्मरागवर्णी आधरांवर धारण केलेल्या,   त्या सुकुमार पंकजनेत्र असलेल्या दुहितेवर

प्रेमात पडल्यावर इतके सुंदर काव्य सुचते हे माहीत नवते हो आम्हाला.

चालूदे चालूदे.