छान लेख. लेखमालेला शुभेच्छा.
मला स्वतःला काही न खाता उपवास करणे शक्य होणार नाही असे वाटते. रोजच्या जेवणाला, संध्याकाळच्या खाऊला जरी उशीर झाला तरी मला ताबडतोब अशक्त वाटून चक्कर येते. एकदम भरपूर खाऊन, बराच वेळ आराम करणाऱ्या प्रकारचे (उदा वाघ सिंहासारखे) पोट किंवा सतत काही तोंडात टाकणाऱ्या प्रकारचे (उदा माकडे, चिंपांझी) पोट या दोन टोकांमध्ये माणसाचे पोट सतत काही तोंडात टाकणाऱ्या वर्गाला जवळचे आहे. त्यामुळे एकदम जोरदार उपास करण्याआधी थोडी थोडी सवय केलेली बरी. नाहीतर पोटात अल्सर वगैरे होण्याची शक्यता!
बाकी उपासाचे फायदे तोटे याबरोबर सुरुवात कशी करावी, खाणे कसे निवडावे यावर माँ मृदुलानंदमयी विवेचन करतील अशी आशा.