बाकी उपासाचे फायदे तोटे याबरोबर सुरुवात कशी करावी, खाणे कसे निवडावे यावर माँ मृदुलानंदमयी विवेचन करतील अशी आशा.
उपासाची सुरुवात कशी करावी हे मी काय डोंबल सांगणार. मी स्वत:च एकही उपास करीत नाही.
उलट शेळीसारखे अखंड चरत असते. मात्र मी एकच म्हणेन, एक दोन दिवसांचे उपास करण्याऐवजी
२४*७*३६५ जास्तीत जास्त फळे, सर्व प्रकारच्या भाज्या आणि मुख्य म्हणजे सर्व तऱ्हेच्या लाह्या वै.
भरपुर खा. जास्तीत जास्त वेळ संगणकासमोर असलो तर इतर काहीतरी हादडण्याऐवजी तांदळाच्या,
ज्वारीच्या लाह्या भरपुर खा. असे म्हणतात की लाह्या हे पूर्णान्न आहे. लाह्यांचा चिवडा पण मस्त लागतो.