रिव्हर्स हॉर्न हा मागील बंपरच्या आतील बाजूस लावलेला असतो...
अगदीच सुमो वगैरे सारखी गाडी असेल तरच तो बॉनेटच्या खाली असतो.
माझ्या माहितीप्रमाणे रिव्हर्स हॉर्नला (कायद्याने) बंदी आहे...(जाणकारांनी खुलासा करावा.)
अगदीच मोठी गाडी असेल, उ. दा. - बेस्ट बस वगैरे तरच तो लावलेला आढळतो... माझ्या मते कारण एकच असावे की या सारखी वाहने शक्यतो गर्दीच्या ठिकाणी फिरत असतात... रस्त्यावरून आपल्याइथे येड** सारखे चालणाऱ्यांना सावध करायला याचा उपयोग होतो.
सोसायटीच्या आवारात गाडी आंत आणतांना रिव्हर्स हॉर्न बंद (बहुतेक वेळेस ही सोय असतेच!) करून आत आणावी एवढं साधं पथ्य सभासद पाळत नाहीत ही शोकांतिकाच नव्हे काय?!
अवांतर- बहुतेकांची ती घरी येण्याची 'स्टाईल' असावी, की घरातल्यांना कळावे आपलीच गाडी आली आहे. आणि ८-बिट चे हॉर्न तर डोक्यात जातात. एअर्टेल/जय जग्दीश हरे/हॅपी बर्थ्डे... अक्षरशः बोगस!