हर्षवर्धन यांच्यासाठी
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...
१) नवीनवेली हा शब्द दोनदा मुद्दामच वापरला...तुम्ही म्हणता तसा त्यातील एक शब्द नवीन वेली अशा अर्थाने वापरलेला नाही.
नवीनवेली या शब्दातच नवेपणाची पुनरावृत्ती (नवी आणि नवेली) आहे हे खरे; पण पहिल्यांदाच दिवस गेल्याच्या नवेपणाची अधिकाधिक तीव्रता [ (आता इथेही पुनरावृत्ती!! तीव्रता ही अधिकच असते... पण माझे तेवढ्य़ाने भागले नाही... मला ती अधिकाधिक हवी होती :) ] मला दाखवायची होती... म्हणून मी हा शब्द दोनदा वापरला. :)
२) पोटातल्या बाळाकडून हलकेच जे पाय झाडले जातात आणि आईला आतून हलकासा (लाथ मारल्यासारखा) जो धक्का बसतो, त्या प्रकाराला ढुशी म्हणतात...
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार...